राहुरी: राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांची बदली, उपजिल्हाधिकारी म्हणून बढती
राहुरी तालुक्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांची पदोन्नतीने बदली झाली असून आता ते नंदुरबार येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने ११ नोव्हेंबर २०२५ रोजी हा आदेश जारी केला आहे. या बदल आदेशामुळे राहुरी तालुक्यात नव्या तहसीलदाराच्या नियुक्तीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.