बोदवड: कुऱ्हा गावात तरुणास तू आमच्या नात्यातील तरुणीला अश्लील मेसेज का पाठवला सांगत दोघांची मारहाण,मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा
Bodvad, Jalgaon | Nov 12, 2025 कुऱ्हा या गावातील रहिवाशी प्रवीण महाजन वय३५ या तरुणाच्या घरात येऊन तू आमच्या नात्यातील तरुणीला अश्लील मेसेज का पाठवला असे सांगत प्रकाश बेलोकार व जयेश बेलोकार या दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि दुखापत केली. तेव्हा दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.