जिंतूर: बोरी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, चार जण गंभीर जखमी
जिंतुर तालुक्यातील बोरी जवळ जिंतुर ते परभणी रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास शिफ्ट डिझायर, लोडिंग टाटा मॅजिक आणि रिअर ऑटो या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.