कोपरगाव: येथील कोल्हे कारखान्याचा देशातील पहिला सीएनजी प्रकल्प सुरू, चेअरमन कोल्हे यांचा लिओ क्लबकडून सन्मान
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून , देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू केल्या बद्दल संजीवनी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा लिओ क्लब, कोपरगांव च्या वतीने आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सन्मान करण्यात आला.या प्रसंगी सत्येन मुंदडा, राजेंद्र शिरोडे, कैलास नागरे, अक्षय गिरमे, अक्षय बोरा, संदीप राशीनकर, मोहन उकिरडे, धीरज कराचीवाला उपस्थित होते.