धरणगाव शहरातील हेडगेवार नगरात एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातून भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत १ लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.