गोरेगावच्या पांगोली नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीवर भरधाव वेगातील बोलेरो धडकल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना दि. 2 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. रोहित नंदेश्वर असे मृतकाचे नाव आहे. गोरेगावच्या पांगोली नाल्याजवळ ही घटना घडली. रोहितला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.