पुणे-बेंगलोर महामार्गावर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून उभा केलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१७ डिसेंबर) रोजी रात्री पुनावळे येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर घडली.याबाबत निखिल नितीन धनावडे (वय २१, रा. पर्वती, पुणे) यांनी गुरुवारी (दि. १८) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.