रत्नागिरी: भाटये, कर्धे, लाडघर अशा विविध समुद्रकिनाऱ्यांवर धोकादायक वाहनांना प्रवेशबंदी; अनेक किनाऱ्यावर बॅरिगेट्स
दोन दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहने अत्यंत धोकादायक पद्धतीने चालवल्या जात असल्याच्या गंभीर प्रकाराची दखल जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी आणि दापोलीतील काही महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दापोलीतील कर्दे आणि मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक पद्धतीने वाहने चालवण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.