चिखली: चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील एटीएम वर चोरट्यांनी मारला डल्ला
चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, आज दुपारी (२१ सप्टेंबर) तीन वाजताच्या सुमारास स्थानिकांना कळाल्यानंतर प्रकरण समोर आले. प्राथमिक माहितीनुसार या एटीएममध्ये तब्बल दहा लाख रुपयांची रोकड होती. मात्र नेमकी किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अद्याप संबंधित प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही.तपास सुरू आहे.