अलिबाग: वाडगाव दत्त मंदिरासाठी मंजूर पिण्याच्या पाण्याच्या योजनेत अनियमितता? ठेकेदाराला ₹10.50 लाख देयक; ग्रामस्थांची तक्रार
Alibag, Raigad | Nov 28, 2025 वाडगाव (ता. अलिबाग) येथील रसानी टेकडीवरील पंचक्रोशीतील दत्त मंदिरासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर व आर.ओ. प्लांट बसवण्याच्या कामाऐवजी, मौजे वाडगाव हनुमान मंदिर परिसरात भाविकांच्या वाहनांसाठी पेव्हर ब्लॉकचे काम दाखवून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माजी सरपंच ऋषिकांत भगत यांनी लिखित स्वरूपात तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.