विक्रमगड: गुरांची तस्करी करणाऱ्यांवर शिरसाड परिसरात कारवाई; दोन आरोपींना अटक
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत शिरसाठ परिसरात गुरांची तस्करी करणाऱ्यांना स्थानिकांनी रंगेहात पकडले आहे. गुरांची तस्करी करणारी कार भरधाव वेगाने जात असताना एका वाहनाला धडकली. या कारमध्ये चार जनावरे कोंबून भरल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि या जनावरांची स्थानिकांनी सुटका केली. त्यानंतर गुरे तस्करी करणाऱ्यांना स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाले केले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत.