नंदुरबार: जय वळवीचा खून करणा-यांना अटक करून फाशी द्या; आदिवासी संघटनांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
नंदुरबार येथे जय वळवी या आदिवासी युवकावर पोलिसादेखत चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या संशयीत आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपीविरुद्ध व पोलिस कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा फाशी द्या व घटनेची एसआयटी चौकशी करून खुनाचा कटकारस्थान करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.