गडचिरोली: देलनवाडी येथे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली कांग्रेस कार्यकर्त्यांची बैठक
आरमोरी तालुक्यातील मौजा देलनवाडी येथे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली वैरागड मानापुर जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली.सदर सभेत तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत , तसेच रस्त्याच्या दुरावस्थेबाबत चर्चा करण्यात आली सदर सभेला मार्गदर्शन करताना माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाऊन काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले