मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग करून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला व वाहनाला ताब्यात घेतले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये आठ गोवंश आढळून आले. आरोपीकडून गोवंश आणि वाहन असा एकूण तीन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी चंद्रपूर निवासी आर्यन राऊत वय 26 वर्ष याला अटक करण्यात आली असून पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे.