कुडाळ: स्वच्छता ही सेवा पंधरवडा सिंधुदुर्गात १७ सप्टें.ते २ ऑक्टों. कालावधीत होणार :मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छोत्सव या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हा उपक्रम सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी सोमवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ओरोस येथे पत्रकार परिषदेत केले आहे.