नांदुरा: केदार नदीला पूर आल्याने टाकळी वतपाळ ते जिगाव संपर्क तुटला
नांदुरा तालुक्यातील केदार नदीला आलेल्या पुरामुळे टाकळी वतपाळ जिगाव संपर्क तुटला आहे.आज 16 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक घरात पाणीसुद्धा शिरले आहेत.नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.