खेड: आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेचा धक्कादायक प्रकार ; १४ वर्षांच्या मुलीला पट्टीने मारहाण
Khed, Pune | Sep 23, 2025 आळंदीतील श्रीधाम मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका १४ वर्षीय मुलीला लाकडी पट्टीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संस्था चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका १४ वर्षीय मुलीने शनिवारी (दि.२०) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी २७ वर्षीय महिला (रा. वडगाव रोड, आळंदी, ता. खेड, जि.पुणे)हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.