बार्शी: मोहोळ चौक वैराग येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी 61 जनावरे वैराग पोलिसांनी पकडली
मोहोळ येथून वैराग मार्गे धाराशिवकडे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या वाहनातून ६१ वासरे त्यामध्ये मृत अवस्थेत ८ वासरे आढळून आली आहेत. हा धाराशिवकडे जाणारा टेम्पो वैराग पोलिसांनी वैराग मधील मोहोळ चौकात पकडून ५३ जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी एका वाहनासह सहा लाख तेरा हजारांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे.