पोलीस अधीक्षक कार्यालयातून नागरिकांना आवाहन
बीड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी आज, मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. यानिमित्ताने बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांनी सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातून रात्री 9:30 वाजता नागरिकांना आवाहन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नागरिकांनी मतदानात उत्साहाने सहभागी व्हावे आणि मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. मतदान केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारचा गोंधळ, गैरप्रकार