अकोला: वाडेगावातील शेतकऱ्याचा न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
Akola, Akola | Dec 1, 2025 अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील साई नगर पेठकरवाडीतील संजय विश्राम साबळे यांनी त्यांच्या गोडावूनमधून १९ ऑक्टोबर रोजी ९ कट्टे सोयाबीन चोरीला गेल्याची तक्रार २० ऑक्टोबरपासून दिली असतानाही बाळापूर पोलिसांनी तपासात कोणतीही प्रगती न केल्याचा आरोप केला आहे. घटना पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटरवर घडूनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तपास योग्य अधिकाऱ्याकडे देण्यात यावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली.