नाशिकमधील ऊर्जा बाल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक कलेपासून आधुनिक विज्ञान प्रयोगांपर्यंत आणि बोलक्या बाहुल्यांच्या धमाल मनोरंजनापर्यंत रंगतदार कार्यक्रमांनी महोत्सव अधिकच उत्साही झाला. वारली चित्रकलेच्या कार्यशाळेपासून ते सत्यजीत पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमापर्यंत मुलांसह पालकांनीही या दिवसाचा मनमुराद आनंद घेतला. ऊर्जा बाल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध कलाकार संजय देवधर यांच्या वारली पेंटिंग वर्कशॉपने झाली. पारंपरिक आदिवासी कलेचा वारसा जपण्यास