धुळे तालुक्यातील कुंडाणे फाटा येथे ट्रक आणि बुलेटच्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. लामकाणीचे साहिल बाविस्कर, निखिल भिल आणि श्रद्धा भिल हे बुलेटवर असताना राँग साईड येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. साहिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ नोव्हेंबर रोजी रात्री धुळे तालुका पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बाविस्कर करत आहेत.