धरणगाव: शार्टसर्कीटमुळे हनुमान नगरात महिलेच्या घराला लागली आग; सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान
धरणगाव शहराच्या हनुमान नगरात राहणाऱ्या एका कुटुंबावर दिवाळी तोंडावर असतानाच मोठे संकट कोसळले आहे. शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत येथील रहिवासी अनिता कैलास महाजन यांचे बंद घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत महाजन कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवज नष्ट झाला आहे.