धुळे: काँग्रेस भवनातील बैठकीत ठरली रणनीती; बोगस मतदार शोधून काढण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
Dhule, Dhule | Nov 7, 2025 धुळ्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदार शोभा बच्छाव आणि प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनिशी तयारीचे आवाहन करण्यात आले. बच्छाव यांनी प्रत्येक प्रभागातील मतदारयादीतील बोगस आणि दुबार नावे शोधून वगळण्याचे निर्देश दिले. सुनियोजित तयारीमुळे काँग्रेसचे अधिक उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.