महाड: स्वस्थ नारी निरोगी परिवार अभियानात रायगड जिल्ह्यातील महिलांनी सक्रीय सहभावा घ्यावा
Mahad, Raigad | Sep 16, 2025 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हाधिकारी जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांच्या नियोजनाने महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वस्थ नारी निरोगी परिवार हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार असून अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले. अशी माहिती मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी दिली.