मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील बालाजी मंदिर येथून ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यासाठी निघाली भव्य शोभायात्रा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सार्वजनिक दसरा उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे,सचिव द्वारका प्रसाद दुबे व सदस्य गण यांच्या पुढाकारातून राम,लक्ष्मण,हनुमानाची वेशभूषा साकारून आठवडी बाजारात साकारलेल्या रावणाच्या प्रतिमाचे दहन करण्याकरिता गुरुवार २ ऑक्टोंबर सायंकाळी सहा वाजता आकर्षक आतीष बाजीत,ढोल ताशांच्या निनादात भव्य शोभायात्रा निघाली असून शुक्रवार आठवडी बाजारातील ५१ फूट उंच रावणाचे दहन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचक्रोशातील जनतेने या सोहळ्याचा आनंद घेतला.