करवीर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन
लोकनेते राजारामबापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत खालच्या पाठीवरती टीका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दसरा चौकात केलेल्या या आंदोलनात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध तर केलास मात्र पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं.