हिरापूर येथील रहिवासी रमेश कडू वराडे वय ६७ हे हिरापूर ते तळेगाव दरम्यानच्या मनमाड कडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकला ओलांडत होते. दरम्यान त्यांना रेल्वेची धडक बसली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.