पाथ्री: नाथरा शिवारात महापुराचे पाणी शिरले केळीच्या बागात
जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला महापुर आला आहे.यामुळे पाथरी तालुक्यातील नाथरा शिवार पूर्ण पाण्याखाली गेले आहे. या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा देखील पाण्यात बुडाल्या आहेत. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.