कन्नड: नाचनवेल शिवारातील एका शेतात जखमी बगळ्याला निसर्गप्रेमींचा आधार; पुन्हा घेतली आकाशात भरारी!
नाचनवेल येथील शेतकरी नितीन व विजय राजपूत यांच्या शेतात दोन दिवसांपासून जखमी अवस्थेत बसलेल्या मोठ्या बगळा पक्षाला अखेर जीवनदान मिळाले. माहिती मिळताच निसर्गमित्र देविदास थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पक्ष्याच्या मानेस जखम झालेली आढळली. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथे डॉ. तय्यब आत्तार व पशुकर्मचारी पालोदकर यांनी उपचार केले. सध्या बगळा थोरात यांच्या देखरेखीखाली सुरक्षित असून सायंकाळी वनविभागाकडे स्वाधीन करण्यात आले.