अंबड नगर परिषद निवडणूक 2025 : दोन नगराध्यक्ष पदासाठी दोन महिला उमेदवारांचे अर्ज दाखल अंबड : अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी दोन महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे दर्शना राहुल खरात यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अंबड नगर परिषदेत दाखल केला. तर यशवंत सेना तर्फे सुवर्णा रामभाऊ लांडे यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत निवडणुकीची झुंज अधिक रंगतदार केली मी