रतनारा पोलिसांनी २६ डिसेंबर २०२५ रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रतनारा बीट परीसरात करण्यात आली. फोनटोली, रतनारा येथील पार्वता बंडु फुलके (५३) रा. फोनटोली, या महिलेच्या घरातून एका प्लास्टिक डबकीतून ७ लिटर मोहफुलाची दारू किंमत २ हजार १०० रुपयाची जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई दुपारी ६ वाजता करण्यात आली. या प्रकरणी पार्वताबाई बंडु फुलके यांच्याविरुद्ध कलम ६५ (२) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल