पंढरपूर: आगामी निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा : मंत्री भरत गोगावले
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे, असे आवाहन राज्याचे मंत्री भरत (शेट) गोगावले यांनी केले. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटकुल येथे नव्याने उभारलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन मंत्री गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राजू खरे, चरणराव चौरे, रमेश बावसकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.