तिवसा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा न घेतल्याचे सिद्ध झाल्यामुळे सरपंच नरेश राठोड यांना अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले. ग्रामसभा न घेतल्यामुळे सरपंचाला पद मुक्त करण्याची मागणी उपसरपंच अभिजीत राठोड,ग्रामपंचायत सदस्य सुभाष चव्हाण यांनी केली होती. ग्रामसभा न घेतल्यामुळे तसेच खोटी कागदपत्रे तयार केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर कागदपत्राची पाहणी करून अपर जिल्हाधिकारी यांनी सरपंच नरेश राठोड यांना अपात्र घोषित केले.