दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सोनबिहरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी दि.४ डिसेंबर रोजी बेड्या ठोकल्या ओमप्रकाश मनीराम पटले वय 47 वर्ष असे आरोपीचे नाव आहे सोनबिहरी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दहा वर्षीय विद्यार्थिनीशी गत काही महिन्यांपासून आरोपी ओमप्रकाश पटले हा अश्लील चाळे करीत होता यामुळे तिच्या वागणुकीत पालकांना फरक जाणवला तिल