शहापूर: उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भवती महिलेला ब्लॅंकेटच्या झोळीमधून रुग्णालयात नेण्याची वेळ, व्हिडिओ व्हायरल
Shahapur, Thane | Jul 23, 2025 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच गर्भवती महिलेला ब्लांकेटच्या झोळीमधून नेण्याची वेळ आली. यापूर्वी देखील जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे अनेक वेळा अशा घटना घडल्या होत्या.त्यातच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील एका महिलेला प्रस्तुतीसाठी शेतातून मार्ग काढून झोळीतून नेण्याची वेळ आली.त्यामुळे दुर्गम भागामध्ये आरोग्याच्या सुविधांची दयनीय अवस्था असल्याचे पुन्हा समोर आले असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.