मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांविषयी केलेल्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी "खासदार बालिश आहेत" अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भंडाऱ्यातील रेती तुटवडा, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या मुद्द्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.