कोपरगाव: आदिवासी प्रवर्गात इतर जातीचा समावेश करु नका, एकलव्य आदिवासी परिषदेचा तहसीलवर मोर्चा
महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच भेटला असताना आता आदिवासी समाजात असंतोषाचे वारे वाहु लागले आहे.आदिवासी प्रवर्गात इतर जातीचा समावेश करण्याच्या हालचाली विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसील कार्यालयावर आज १९ सप्टेंबर रोजी एकलव्य आदिवासी परिषदेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.एकलव्य अदिवासी परिषदेचे संस्थापक मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.