सिन्नर: वडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
Sinnar, Nashik | Sep 20, 2025 विनय बाळकृष्ण आव्हाड यांच्या वडगाव शिवारातील घरामागे गाय बांधलेली असताना अचानक पहाटे बिबट्यांनी हल्ला करत ठार केले. आव्हाढ हे कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहत असून पहाटेच्या सुमारास गायीचा हंबरण्याचा त्यांना आवाज आला. त्यानंतर काही वेळातच ते धावत पाठीमागे गेले असता बिबट्याने तेथून पळ काढला.