पुणे शहर: नवरात्रीत तांबडी जोगेश्वरी देवीचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतलं दर्शन
Pune City, Pune | Sep 22, 2025 नवरात्रीच्या पावन पर्वावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीस महावस्त्र, तुपाचा प्रसाद, पुरणपोळ्या तसेच श्रीफळ अर्पण करून समाजातील प्रगतीशील कामकाजाबद्दल देवीचे आभार मानले.