महाड: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे कर्जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Mahad, Raigad | Sep 15, 2025 आज सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे कर्जत तालुक्यातील नरेश जोशी व माधवी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे मन:पूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद झाला. दोन्ही नवीन कार्यकर्ते समाजकार्याची जाणीव असलेले, लोकांच्या समस्या जाणून घेणारे आणि सक्रियपणे कार्य करणारे आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, याची मला खात्री आहे.