खुलताबाद: तिसगाव शिवारात दोन ठिकाणी दरोडा; ९० हजार रोकड व सोन्याचे दागिने लंपास
तिसगाव शिवारात दोन ठिकाणी दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत भागीनाथ सकाराम गोल्हार यांच्या राहत्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून मोटारसायकल घेण्यासाठी जमवलेले सुमारे ९० हजार रुपये रोख, कानातील जोडवे व नाकातील नथ असा ऐवज लंपास केला.तर दुसऱ्या घटनेत शेतातील एका घरावर चोरट्यांनी हात साफ केला असून तिथे ही मोठा दरोडा टाकला आहे दोन्ही घटनांची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.