यवतमाळ: शहरातील आरोग्यसेवेला गंज – हॉस्पिटल परिसर घाणीच्या गर्तेत,रुग्ण-नागरिकांचे आरोग्य धोक्यात
यवतमाळ शहराच्या टिळकवाडी-बापट चौक परिसरात असलेल्या रुग्णालये,मेडिकल स्टोअर्स,डायग्नोस्टिक लॅब्स आणि आयसीयू युनिट्समुळे हा भाग आरोग्यसेवेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हजारो रुग्ण उपचारासाठी रोज येथे दाखल होतात.मात्र,या परिसरातील अस्वच्छता,साचलेले पाणी आणि बायोमेडिकल वेस्टेज यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.