लांजा: आंबा घाटात झुंजी दरम्यान कड्यावरून पडून दोन गवारेडयांचा मृत्यू
आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेडयांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. साखरपा कोल्हापूर कडे जाणाऱ्या या मार्गावर हायवेच्या उजव्या बाजूला दोन गवा रेडा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत झाले असल्याची बातमी वन रक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा याने वनपाल संगमेश्वर यांना दिली.