अमळनेर: अमळनेर रेल्वे स्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.