जालना: मुरारी नगर भागात चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद; सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Oct 27, 2025 जालना शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून रोजच कोणत्या ना कोणत्या भागात चोर्या करुन दहशत निर्माण करीत आहेत. पोलीसांच्या नाकावर टीच्चूत गुन्हेगार गुन्हे करीत आहेत. असाच एक चोरी करण्याचा प्रकार मुरारी नगर भागात घडला. सोमवार दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. हा प्रकार मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.या प्रकरणात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.