मलकापूर: धोंगर्डी फाट्याजवळ धारदार कोयत्याने हल्ला युवक गंभीर जखमी
मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी फाट्याजवळ १ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात २८ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. झोडगा येथील प्रतीक दिलीप मोरे (वय २८) आणि हरसोडा येथील ज्ञानेश्वर मुरलीधर झाल्टे (वय ३२) यांच्यात भांडण झाले. वाद चिघळताच ज्ञानेश्वर झाल्टे याने कोयत्याने प्रतीक मोरेवर वार केले, ज्यात त्याच्या कान, मान आणि डोक्यावर खोल जखमा झाल्या. जखमी प्रतीक मोरे खाली कोसळल्यावर स्थानिकांनी तात्काळ त्याला मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.