आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून शेकापच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी 'हाती कमळ' घेतले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शेकापचे खंदे कार्यकर्ते संदीप नाईक आणि श्री नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कर्त्यांचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.