हिंगणघाट: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी पुणे येथून मोठ्या शिताफीने घेतले ताब्यात
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पीडित मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.तपास करीत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस तपास केला.