कडेगाव: नेवरी (ता. कडेगाव) – चोरट्यांनी एसटी बसथांब्यानजीकच्या अस्मिता ज्वेलर्सवर धाडसी चोरी केली.
शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तोंडाला कापड बांधून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर मोडून, काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरीची घटना नजीक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्रामस्थांना सकाळी फिरायला गेल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. त्यानंतर लगेचच महाडिक यांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली महाडिक यांनी सांगितले की, चोरट्यांनी ५,००० रुपये रोख रक्कम व ५,००० रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले.या प्रकरणी रविवारी (१ जून) सकाळी ११ वाजता कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह